– महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांचा 81 हजार मतांनी पराभव
देशोन्नती विशेष मुलाखत | विजयी उमेदवार मतदारांचे आभार मानतो – – अमर काळे
- विजयाची कारणे
> वर्धा लोकसभा मतदारसंघावर फडकला महाविकास आघाडीचा झेंडा
> भारतीय जनता पक्षाचे रामदास तडस यांची हॅटट्रीक रोखली
> अर्ज भरण्याच्या दिवशी तप्त उन्हात शरद पवारांची उपस्थिती ऊर्जादायक
> उमेदवाराच्या पसंतीसह महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाचे तन्मयतेने काम
विदर्भातील एकमेव जागेवर वर्धा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा झेंडा
काळेंना पाच मतदारसंघात आघाडी | मोर्शीत तडस पुढे | सुमारे ८० हजार मतांनी विजयाचा अंदाज |
वर्धा (Wardha) : सर्वप्रथम विजयाबद्दल मतदारांचे आभार मानत असल्याचे सांगून अमर काळे यांनी वर्धा मतदारसंघांमध्ये एक लाख ८७ हजार भारतीय जनता पक्षाचा विजय झाला होता. एक लाख ८७ हजारांचा मायनस भरून आम्हाला पुढे जायचे होते. त्यामुळे विजय म्हणजे परीक्षा मोठी कठीण होती, असे विजयी उमेदवार अमर काळे म्हणाले. आज जो विजयश्री प्राप्त झालेला आहे त्याबद्दल सर्व महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi ) कार्यकर्त्यांचे आभार मानतो. ज्यांनी मी नाही तर अमर काळे म्हणून काम केले. दिवसरात्र एक केल. त्यामुळे हा विजय श्री खेचून आणला, या विजयाचे श्रेय महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना जाते, असे अमर काळे म्हणाले. अल्पावधीतच तुतारी मतदारांपर्यंत पोहोचली. यावेळी नवीन चिन्ह तसेच नवीन पक्ष असल्याने मतदारांपर्यंत कसे पोहोचणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. पण, अल्पवधीतच हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचले आणि पहिल्याच टप्यात विजयही प्राप्त केला. मतमोजणीदरम्यान पहिल्या फेरीत महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांना अल्प अशी १४ मतांची लीड मिळाली. दुसऱ्या फेरीपासून मात्र अमर काळे यांना मताधिक्य मिळाले आणि सातत्याने हे मताधिक्य वाढत गेले.
-
पराभवाची कारणे
रामदास तडस, भाजपा (Ramdas Tadas, BJP ) महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांना पक्षांतर्गत कुरबुरींचा फटका बसला. तडस हे सलग तिसऱ्यांदा रिंगणात होते. त्यामुळे अनेक ठिकाणी नाराजीचे सूर ऐकू येत होते. तहस यांना यावेळी जनतेची साथ मिळाली नाही. तडस यांच्याविरोधात वातावरण दिसून येत होते. महायुतीच्या वरिष्ठ पातळीवरील फोडाफाडीच्या राजकारणाचाही परिणाम झाला. त्यामुळदेखील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. ग्रामीण भागातील मतदारांनी सपशेल नाकारले. मोदींची लाट चालली नाही. २०११ ला मिळालेली आघाडी कमी होणार, हा आत्मविश्वास नडला. तडस हे सहज उपलब्ध होणारे सर्वसामान्य लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. पण, विविध मुद्दे त्यांच्याविरोधात वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत ठरले.
-
जनतेचा कौल मान्य आहे
मोदीची लाट कायम आहे. येणाऱ्या काळात विचार करण्याची गरज आहे. पराभवाची कारणे शोधू तसेच यावर मंथन करू. पुन्हा जनतेच्या दरबारात जावू, जनतेचा कौल मान्य आहे. विजयाबद्दल अमर काळेयांना शुभेच्छा देतो. त्यांनी विकासाची कामे करावी. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे, अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी व्यक्त केली
-
तुतारीचा विजय
वर्धा सुरूवातीपासून उत्कंठापूर्ण राहिलेल्या वर्धा लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी ४ जून रोजी जाहीर झाला. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारात थेट लढत होईल, ही बाब स्पष्ट होती. वर्धा लोकसभा मतदारसंघात ( Wardha Lok Sabha Constituency ) महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून अमर काळे यांनी विजयश्री मिळविली. येथे महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांना पराभवाचा सामना करावा लागला. काळे यांना विजय मिळाल्याने तडस यांची हॅटट्रीक मात्र हुकली. अवघ्या काही दिवसांतच तुतारी नागरिकांपर्यंत पोहोचून अमर काळे विजयी झाल्याने भाजपच्या विजयाचा दावा करणाऱ्यांना धक्का बसला. मतमोजणीची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू राहिल्याने विजयी घोषणेची औपचारिकता बाकी होती.वर्धा लोकसभा मतदारसंघात २४ उमेदवार रिंगणात होते. प्रत्येक उमेदवाराने कसोशिने प्रचार करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. सर्वांना निकालाची प्रतिक्षा लागलेली होती. वर्ध्याच्या बरबडी मार्गावरील एफसीआय गोदाम परिसरात मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. पहिल्या फेरीपासूनच उत्सूकता वाढू लागली होती. पहिल्या फेरीत महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांना केवळ १८ मतांची लीड मिळाली होती. या फेरीत अमर काळे १९५६५ तर रामदास तडस यांना १९५८३ मते मिळाली. दुसऱ्या फेरीपासून अमर काळे यांना मताधिक्य मिळण्यास सुरूवात झाली. प्रत्येक फेरीनिहाय ते मताधिक्य वाढत गेले. फेऱ्या संपत येत असताना महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा विजय पक्का होऊ लागताच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलले. मात्र दुसरीकडे महायुतीच्या (Grand Alliance) कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, मतमोजणीबाबत प्रत्येकालाच उत्सूकता लागेलली होती. दोन फेऱ्या शिल्लक असताना अमर काळे यांचे मताधिक्य ५० हजारांच्या पुढे गेले होते. विजय दृष्टीपथास आघाडीच्या महाविकास कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, ढोल वाजवत जल्लोष साजरा केला. मतमोजणीस्थळी प्रशासनाकडून येथे जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी आठ वाजतापूर्वीच मतदान मोजणीस्थळी अधिकारी, कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी पोहोचले होते. प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबलवर मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी आठ वाजता टपाली मतपेटीच्या गणनेला सुरूवात केल्या गेली. त्यानंतर काही वेळाने ईव्हीएम मशिनच्या मतमोजणीला सुरूवात झाली. २७ व्या फेरीनंतर निकाल जाहीर करण्यात आला.