बुटीबोरी येथील घटना
वर्ध्यात कारसह, बंदुकीसह कारतूस जप्त
वर्धा (Wardha Robbery) : नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे एका दुकानात लूटमार करून १५००० रुपये आणि मोबाईल घेऊन पळालेल्या चौघांना पोलिसांनी वर्ध्यात जेरबंद केले. ही (Wardha Robbery) कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे शस्त्राच्या धाकावर एका दुकानामध्ये लुटमरीची घटना घडली. शस्त्राच्या धाकावर दुकानातील पैसे लुटून पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू झाला. बुटीबोरी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून लागलीच याबाबत (Wardha Robbery) वर्धा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सापळा रचत शहरात नाकाबंदी करून चौघांना जेरबंद केले.
पोलिसांनी रवींद्र सिंग लखन सिंग जुनी रा. कारला चौक हनुमानगड वर्धा, तुषार दामोदर सहारे रा. बुटीबोरी नागपूर, नयन दत्ताजी कडू रा. संयोग कॉलनी कारला रोड पिपरी मेघे वर्धा, मंथन महादेव मोहरले रा. बुटीबोरी नागपूर या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. कुणाल हेमने रा. नागपूर याचा शोध सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. बुटीबोरी पोलीस रात्री महादेवपुरा परिसरामध्ये पंचनामा करीत होते. (Wardha Robbery) वर्धा पोलिसांनी आरोपींना त्यांच्या ताब्यात दिले.