वर्धा(Wardha):- सेलू तालुक्यातील कोपरा या गावाचा गरीब युवकाने आर्थिक विवंचनेतून गळफास घेतल्याची घटना नुकतीच उघडकीस आली युवकाचे नाव प्रफुल किसनाजी श्रीखंडे वय वर्ष 40 असे आहे.
दुधाचा व्यवसायात नुकसान झाल्याने तो सतत विवंचनेत असायचा
प्रफुल हा मोलमजुरी करून दुधाचा व्यवसाय कराचा दुधाचा व्यवसायात नुकसान झाल्याने तो सतत विवंचनेत असायचा काल दुपारच्या सुमारास तो घरून निघून गेला. गावातील काही नागरिकांनी त्याचा शोध घेतला परंतु तो मिळाला नाही तर आज सकाळी आठ वाजताच्या दरम्यान कोपरा गावाबाहेरील बोर नदीच्या काठावर निंबाच्या झाडाला लटकवलेली त्याचे प्रेत आढळून आले. आर्थिक विवंचनेतून प्रफुल ने आत्महत्या (Suicide) केल्याचे निदर्शनास आले घटनेची माहिती दहेगाव पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक संजय खोब्रागडे व त्यांचे सहकारी यांनी येऊन पंचनामा केला.