कारंजा(Washim):- स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गावर(Prosperity Highway) कार अपघात होऊन तीन जण गंभीर (severe) जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजून 45 मिनिटांनी चॅनेल 186 वर पुन्हा कार अपघात घडला आणि यात सुत्रांच्या माहितीनुसार नायब तहसीलदार गंभीर जखमी झाले. अजय लक्ष्मणराव बनारसे वय 40 वर्ष असे अपघातात (Accident)जखमी झालेल्या नायब तहसीलदाराचे नाव असून ते चांदूरबाजार येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे.
ओव्हरटेक करण्याच्या नादात हा घडला अपघात
सुत्रांच्या माहितीनुसार, 5 जण इनोवा क्रिस्टा कारमध्ये बेंगलोरवरून अमरावती येथे जात असताना चॅनल 186 वर मागून येणाऱ्या एका ट्रकने कारला कावा मारला, ओव्हरटेक (Overtake)करण्याच्या नादात हा अपघात घडला. घटनेनंतर 108 चे पायलट आतिश चव्हाण, डॉक्टर गणेश यांनी जखमीला उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आणि तेथील प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बाहेरगावी पाठविण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. दरम्यान , घटनास्थळी फायर टीम 112 टीम रुग्णवाहिका व हायवे पोलीस उपस्थित होते.