इच्छुक लागले कामाला
पंचायत समिती सभापतीचा गण झाला ओपन मात्र सभापतीपद झाले आरक्षित
पंचायत समिती कुरुंदा, आंबा, आरळ, गिरगाव सर्वसाधारण, टेंभुर्णी अनुसूचित जाती, पांगरा शिंदे महिला
वसमत (Wasmat Panchayat Samiti) : वसमत पंचायत समितीच्या गणाचे आरक्षणाची सोडत सोमवारी करण्यात आली यात मोठ्या गावचे गण ओपन सुटले आहेत त्यामुळे अनेकांनी सुटकेच्या श्वास घेतला गत वेळी सभापती असलेले कुरुंदा गण यावेळीही ओपन साठी सुटली आहे मात्र पंचायत समिती सभापती पद अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव झाले आहे.
वसमत वसमत पंचायत समितीच्या (Wasmat Panchayat Samiti) गणाचे आरक्षण सोडत सोमवारी करण्यात आली कै सूरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह वसमत येथे 24 गणांची सोडत काढण्यात आली सोडत काढण्यासाठी यावेळेस उपविभागीय अधिकारी विकास माने, नायब तहसीलदार डोणगावकर, जाधव. अनिल पाटील, शेखशफी , अब्दुल सत्तार यांच्यासह निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते तालुकाभरातून इच्छुक उमेदवार आजी-माजी पदाधिकारी व विविध पक्षाचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते कुरुंदा गिरगाव आंबा आरळ या प्रमुख पंचायत समिती गण ओपन झाले आहेत.
तालुक्यातील प्रमुख पंचायत समिती (Wasmat Panchayat Samiti) गण समजल्या जाणाऱ्या गणात सर्वसाधारण आरक्षण निघाल्याने येथे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. वसमत पंचायत समितीचे सभापती पद गत वेळेस ओपन साठी सुटले होते व कुरुंदा पंचायत समिती गण सुद्धा ओपन साठी सुटले होते त्यावेळी चंद्रकांत दळवी हे सभापतीपदी विराजमान झाले होते. यावेळीही कुरुंदागण ओपन साठी सुटला आहे. त्यामुळे एकीकडे सुटकेचा श्वास सोडत असताना दुसरीकडे मात्र सभापती पद राखीव झाल्याने अडचण झाली आहे.
वसमत पंचायत समिती (Wasmat Panchayat Samiti) साठी एकुण 24 सदस्य असलेल्या पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत खालील प्रमाणे आहे. यामध्ये इतर मागास प्रवर्गासाठी सहा जागा राखीव आहेत त्यातील तीन जागा महिलांसाठी राखीव आहेत तर अनुसूचित जाती जमातीसाठी चार जागा राखीव आहेत त्यातील दोन जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत एसटी प्रवर्गासाठी एक जागा राखीव आहे ती महिलांसाठी राखीव झाली आहे तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सहा जागा राखीव आहेत सोडत मध्ये खालील प्रमाणे आरक्षण निघाले आहेत.
पांग्रा शिंदे –सर्वसाधारण महिला,सुकळी – अनुसूचित जमाती एसटी-महिला
कुरुंदा -सर्वसाधारण पार्डी खु.-इतर मागास प्रवर्ग महिला,कौठा इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण ,धामनगांव सर्वसाधारण
आंबा- सर्वसाधारण,कोर्टा – सर्वसाधारण महिला
टेंभूर्णी – अनुसूचित जाती महिला,
आरळ -सर्व साधारण,करंजाळा – सर्वसाधारण महिला, बोरीसावंत – सर्वसाधारण, हट्टा – इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण-,आडगांव – इतर मागास प्रवर्ग महिला,खांडेगांव –अनुसूचित जाती सर्वसाधारण, अकोली -सर्वसाधारण,हयातनगर -इतर मागास प्रवर्ग महिला,रिधोरा – अनुसूचित जाती महिला,रिधोरा अनुसूचित जाती महिला गिरगांव सर्वसाधारण, पार्डी बु. सर्वसाधारण महिला, बाभुळगांव -सर्वसाधारण महिला,
वाखारी –सर्वसाधारण महिला, आसेगांव – अनुसूचित जाती सर्वसाधारण, पळसगांव त. माळवटा – इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण साठी राखीव झाले आहे.
आरक्षण सोडत असल्याने पंचायत समिती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले इच्छुक उमेदवार ग्रामीण भागातील विविध भागातून कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.