हिंगोली (Water Campaign) : शासनाचे १०० दिवस मोहिमेंतर्गत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपविभाग हिंगोली आहे. या उपविभागाच्या वतीने कार्यालय सुसज्ज व अद्यावत केले आहे. शासनाच्या विविध बांधकाम क्षेत्रात येणारी कामे त्यांचे अंदाजपत्रके व इतर शासकीय पत्रव्यवहार यांच्या संचिका व्यवस्थित करून प्रत्येक कर्मचारी विभाग अद्यावत केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग हा केवळ बांधकाम क्षेत्रापुरता मर्यादीत न ठेवता या परिसरात (Water Campaign) पाण्याचे पुर्नरभरणही करण्यााठी दोन विंधन विहिरीसाठी पावसाचे पाणी जमिनीत पुर्नरभरण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे तंत्रयान वापरून दोन पुर्नरभरण हौद करण्यात आले आहेत. या परिसरातील पाणी वाहून न जाता त्याचे शंभर टक्के पुर्नरभरण व्हावे हा त्यामगचा हेतू आहे.
या बरोबरच या परिसरात जे वृक्ष लागवड आहे त्याठिकाणी अनेक पशु-पक्षी येतात. पक्षांसाठी झाडावर (Water Campaign) पाणी पिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षीच्या उन्हाळ्याची दाहकता पाहता अनेक जनावरे रस्त्यावर पाण्यासाठी भटकंताना दिसतात. त्याच्यासाठी उपविभाग हिंगोलीच्या वतीने विश्राम गृहाच्या प्रवेश द्वाराजवळ जनावरांना पाणी मिळावे अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
या सर्व उपक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डि.जी. पोतरे, सा.बां. उपविभागाचे उपविभागीय अभियंता सुदेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली अभियंता गजानन खोरणे, अभियंता बुटोले, अनिल मोहाडे, दयानंद धाडवे, कर्मचारी इब्राहीम गोरवे, प्रमोद पाठमोचे, मुजीब पठाण यांनी तर कंत्राटदार नाना बांगर सुनिल वाकोडकर यांनी परिश्रम घेतले.