यवतमाळ (Yawatmal) :- वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या विरोधात यवतमाळ मध्ये जिल्हास्तरीय भव्य जनआक्रोश जनसभेचे आयोजन १४ जून रोजीकरण्यात आले. यावेळी सभेचे अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सेक्रेटरी मौलाना महफूज रहेमानी यांनी वक्फ बाबतचा ‘वक्फ सुधारणा कायदा २०२५’ (Waqf) हा काळा कायदा सरकारला रद्द करण्यासाठी भाग पाडू असा निर्धार आपल्या संबोधनातून व्यक्त केला.
जनआक्रोश सभेमध्ये मौलाना उमरैन महफूज रहमानी यांचा निर्धार
यावेळी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड विदर्भचे समन्वयक मुफ्ती फिरोज खान यांनी सभेची प्रस्तावना केली. तर वहदत ए इस्लामीचे कुलहिंद सदर जियाउद्दीन सिद्दिकी औरंगाबाद, जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र चे सदर इंडिया मौलाना रफिऊद्दीन अशरफी दिल्ली, विशेष अतिथी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल ला बोर्ड सदस्य अश्फाक कासमी, अ.भा.ओबीसी महासंघाचे ज्ञानेश्वर गोरे, अॅड. जयसिंग चव्हाण यांनी जनआक्रोश सभेला संबोधित केले.वक्फ सुधारणा कायद्या २०२५ रद्द करा अशी मागणी करीत वक्फ काळ्या कायद्याविरुद्ध वक्फ बचाओ, दीन बचाओ कमिटी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड समिती यवतमाळ द्वारे १४ जून रोजी संध्याकाळी पांढरकडा मार्गावरील रॉयल पॅलेस येथे या जनाक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते.
शेकडो जणांनी घेतले परिश्रम
यात हजारोंच्या संख्येने वणी, दारव्हा, दिग्रस, आर्णी, बाबुलगाव, कळंब, घाटंजी, यवतमाळ, तसेच जिल्ह्यातून मुस्लिम नागरिक सामील झाले. या प्रसंगी मौलवी सय्यद हमजा, यवतमाळ जिल्हा तबलीगी जमात चे अमीर हाजी अब्दुल रजाक, आ. बाळासाहेब मांगूळकर, काजी गझनफर अली पांढरकवडा, मौलाना अय्युब पाटनबोरी, मौलवी अब्दुल माजिद आर्णी,सय्यद युनूस बुखारी पुसद, मौलाना रिझवानऊल्लाह नदवी नेर, मौलाना सादिक दिग्रस, मुफ्ती सादिक दारवा,मौलाना अजहर नदवी कळंब मंचावर उपस्थित होते. या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी जिल्हा समन्वयक मुफ्ती इनामुल्लाह खान, यवतमाळ वर्किंग कमिटी चे सदर मौलाना शारिक मजाहीरी, कुल जमात विफाक, औकाफ बचाव संविधान बचाव समितीचे सदर डॉ शेख मुजीब, वक्फ बचाओ दीन बचाओ अभियान समितीचे मुफ्ती सोहेल, हाफिज शेर खान यांच्यासह शेकडो जणांनी परिश्रम घेतले.