पुढील 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
नवी दिल्ली/मुंबई (Weather Forecast) : उष्णतेमुळे त्रस्त असलेल्या उत्तर भारतात आता मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने 22 ते 26 जून दरम्यान देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते (Weather Forecast) अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. वायव्य भारत, मध्य प्रदेश, गुजरात, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते (Heavy Rains) अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या पाच दिवसांत जेव्हा जेव्हा घराबाहेर पडाल, तेव्हा बाहेर पडण्यापूर्वी हवामान अपडेट तपासावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या भागात मुसळधार पाऊस
आयएमडीने सांगितले की, जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम आणि पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम आणि पूर्व राजस्थानमध्ये (Heavy Rains) वादळाची शक्यता आहे. या काळात वीजही पडू शकते, म्हणून इशारा जारी करण्यात आला आहे.
ईशान्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस
आयएमडीने पुढील तीन दिवस ईशान्य भागात मुसळधार ते (Heavy Rains) अतिमुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाच्या मते, पुढील दोन दिवसांत नैऋत्य मान्सून उत्तर अरबी समुद्राच्या उर्वरित भागात आणि राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मूच्या काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे, त्यामुळे राजधानीत (Weather Forecast )येलो अलर्ट जारी केला आहे.
मच्छिमारांसाठी इशारा
हवामान विभागाने 22-27 जून दरम्यान अरबी समुद्र क्षेत्र, गुजरात किनारा, कोकण किनारा, कोकण किनारा, सोमालिया, ओमान आणि येमेन किनारपट्टीवर मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांसाठी इशारा जारी केला आहे. (Weather Forecast) बंगालच्या उपसागराच्या संदर्भात, मच्छिमारांना 22-25 जून दरम्यान उत्तर आंध्र प्रदेश किनारा, ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीवर आणि 22 ते 26 जून दरम्यान अंदमान समुद्रात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.




