हवामान विभागाकडून विविध राज्यांसाठी अलर्ट जारी
नवी दिल्ली (Weather Forecast) : भारतीय हवामान विभागाने (IMD) आज 8 मे 2025 साठी संपूर्ण देशासाठी हवामान अंदाज जारी केला. यावर्षी मान्सून लवकरच दाखल होणार असून, मान्सून 13 मे पर्यंत अंदमनात- निकोबार दाखल होणार असल्याचा अंदाज (Weather Forecast) भारतीय हवामान विभागाने जारी केला आहे. ज्यामध्ये अनेक राज्यांमध्ये विविध प्रकारच्या (Meteorological Department) हवामान धोक्यांचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी, हवामान खात्याने भारतातील काही भागात उष्णतेच्या लाटेच्या परिणामाबद्दल इशारा दिला आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा 8 ते 10 दिवस आधीच आगमन होणार असल्याची माहिती (Meteorological Department) हवामान विभागाने दिली आहे. ईशान्य भारतात मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि हिमालयीन प्रदेशात बर्फवृष्टीचा अंदाजही वर्तवला आहे. अंदमान- निकोबार बेटांवर मान्सूनच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. याशिवाय, राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात वादळ आणि हलक्या पावसामुळे तापमानात घट होण्याचा अंदाज आहे. देशाच्या इतर भागातही (Weather Forecast) हवामानात बदल होण्याची चिन्हे आहेत, जी येत्या काळात नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरू शकतात.
यावर्षी देशामध्ये 105 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (Weather Forecast) वर्तवला आहे. हवामान विभागाने विविध राज्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. यंदा मान्सून १३ मेपर्यंत अंदमनात- निकोबार दाखल होणार असल्यामुळे यावर्षी 10 दिवस आधीच (Monsoon 2025) मान्सून सगळीकडे दाखल होणार आहे. हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन लोकांना त्यांच्या प्रवासात आणि दिनचर्येत बदल करण्याचे आवाहन केले आहे.
ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस
8 मे पासून ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागात (Heat wave) उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. या भागातील कमाल तापमान सामान्यपेक्षा 1-3 अंशांनी जास्त राहू शकते. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात 7 ते 11 मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह (Heavy Rain) मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दिल्ली-एनसीआरमध्ये वादळ आणि पाऊस
8 मे रोजी राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात अंशतः ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. (Weather Forecast) हलका पाऊस, गडगडाट आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे (Heavy Rain) वाहण्याची शक्यता आहे.
तापमानात चढउतार होण्याची शक्यता
पुढील 24 तासांत वायव्य भारतात तापमानात (Heat wave) कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही, परंतु त्यानंतर ते 3-5 अंशांनी कमी होऊ शकते. त्याच वेळी, पूर्व भारतात तापमान 4 दिवस स्थिर राहू शकते, त्यानंतर 2-4 अंशांनी वाढ शक्य आहे. (Weather Forecast) हवामान विभागाची वेबसाइट किंवा स्थानिक अधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना तपासण्याचा आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे.