-हंगामात ४८ हजार हेक्टरवर लागवड
वर्धा (Wardha) खरीप हंगामा सुरू होण्यासाठी महिनाभर उशीर आहे. अशात शेतीच्या (Agriculture) बी -बियाण्यासह खतांची जुळवाजुळव सुरू असून पेरणीच्या नियोजनात शेतकरी व्यस्त आहे. कपाशीवर बोंडअळी,(Bollworm on cotton) बाजारात कमी दर आणि लागत खर्च बघता यंदा तालुक्यात कपाशी पेरा घटणार असून सोयाबीन तूर (Soybean flour) पिकाचा पेरा करण्याकडे कल शेतकऱ्यांचा दिसून येत आहे. अनेक शेतकरी कपाशी पिकाला पर्यायी पीक शोधत असल्याचे दिसून येत आहे. लांब धाग्यांचा(long threads) कापूस पिकविणारा भाग म्हणून सेलू तालुक्याची ओळख आहे. पण गत वर्षीच्या तुलनेत उत्पादनात घट आली असतानाही कापसाला मिळालेला सात हजार रुपये भाव, शेतकऱ्यांना आर्थिक तोट्यात नेणारा ठरला. रासायनिक खत कीटकनाशके, व मजुरीचा खर्चही निघाला नसल्याने कापूस पिकापासून शेतकरी फारकत घेत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तर मागील वर्षी सोयाबीन पिकाने धोका दिला असला तरी कमी खर्चात येणारे पीक असल्याने व त्यानंतर गहू हरभरा घेता येत असल्याने खरिपात सोयाबीनच्या पेरा कपाशी पिकाला पर्यायी पिकाच्या शोधात शेतकरी.
हंगामात ४८ हजार हेक्टरवर लागवड सेलू तालुक्यात पेरणी योग्य सर्व साधारण क्षेत्र ४८१०८.७६ हेक्टर मागील खरीप हंगामात होते. त्यात कापूस (Cotton) २३१२० हेक्टरतर सोयाबीन (soybeans) पीक १७६६९.७ हेक्टर मध्ये लागवड केली होती. ५ हजार २१५ हेक्टरमध्ये तुरीचे पीक होते. कापसाला ७ हजार, सोयाबीनला जवळपास ४ हजार तर तूर ८ ते १० हजार रुपये भाव मिळाला या तीन पिकाच्या तुलनेत तुरीला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचा कल येणाऱ्या खरीप हंगामात तूर पिकाकडे आहे. तर सोयाबीन पिकानंतर गहू हरभरा ही पिके घेता येत असल्याने सोयाबीन व तुरीचा पेरा वाढणार असल्याचे शेतकरी सांगत आहे.
केळी पिकाकडे कल
एके काळी केळी बागायतदरांची संख्या मोठ्या प्रमाणात होती मध्यंतरी केळीचे पीक नाम शेष झालेल्या तालुक्यात ८१.९ हेक्टरमध्ये केळी लागवड होती. आता या पिकाखाली क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येत आहे. या विषयी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना (Department of Agriculture) मार्गदर्शन मिळाल्यास तालुक्याला पूर्वीचे वैभव प्राप्त होण्यास मदत होणार आहे.
प्रशिक्षणाची गरज
सेलू तालुका कृषी विभाग (Selu Taluka ) अंतर्गत गत काही वर्षाअगोदर शेतकऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग चालायचे, पण अलीकडे हे वर्ग बंद झाले. शासनाच्या विविध योजनांची माहिती, पिकाबाबतचे मार्गदर्शन, फळ बागा व फुल बागा कश्या वाढतील या बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंडळ स्तरावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.