पाणी टंचाईची तीव्रता दिवसागणिक वाढतीला
यवतमाळ (Well Acquisition) : जिल्ह्यात मागील दोन वर्षांपासून जलजीवन मिशनची कामे ग्रामीण भागामध्ये मोठ्या संख्येने सुरु आहे. मात्र शासनाकडून आवश्यक त्या कालावधीमध्ये देयकांसाठी आवश्यक निधीची परिपूर्ती केली जात नसल्याने, त्याचा फटका प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जलजीवन मिशनच्या कामाला बसत असून त्यातून ग्रामीण भागामध्ये पाणी टंचाईची तिव्रता अधिक भिषण होतांना दिसून येत असून, जिल्ह्यात २४ गावांमध्ये टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे, तर १६७ विहिरींचे अधिग्रहण (Well Acquisition) करून स्थानिकांना पाणी पुरवठा केल्या जात आहे.
उन्हाळ्याच्या मे महिन्यामध्ये ग्रामीण भागात पाणी टंचाई अधिक तीव्र झाली असून २४ गावांमध्ये टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जात आहे. यामध्ये पुसद तालुक्यात बुटी(ई), वडसद, रामपूरनगर, येलदरी, शिवानगर, मधुकरनगर, कारला, वेणी(खू), ब्राम्हणगाव/ शामपूर, हर्षी येथे तर आर्णी तालुक्यात उमरीपठार, सिंगरवाडी, चिमटा, पाळोदी, सुधाकरनगर, देवगाव, ईचोरी, दहेली, यवतमाळ तालुक्यातील घोडखिंडी(पां), माळम्हसोला, चांदापूर तर दारव्हा तालुक्यातील करजगाव, तारनाळी, तेलगव्हाण येथे टँकर व्दारे पाणी पुरवठा केल्या जात आहे.
तसेच १६७ गावांमध्ये शासनाने विहिरींचे अधिग्रहण (Well Acquisition) करून स्थानिकांना पाणी पुरवठा केल्या जात आहे. यामध्ये पुसद तालुक्यातील १९ गावांमध्ये ४ बोअरवेल तर १६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दिग्रस तालुक्यात २२ गावांमध्ये २४ विहिरी, आर्णी तालुक्यात ३२ गावांमध्ये ६ बोअरवेल तर २८ विहिरी, महागाव तालुक्यात २० गावांमध्ये ५ बोअरवेल, २२ विहिरी, घाटंजी तालुक्यातील ७ गावांमध्ये १ बोअरवेल, ६ विहिरी, झरी जामणी तालुक्यात एका गावात एक बोअरवेल, दारव्हा तालुक्यात २० गावांमध्ये २२ विहिरी, नेर तालुक्यात १६ गावांमध्ये २ बोअरवेल,१४ विहिरी, वणी तालुक्यात ७ गावांमध्ये ७ बोअरवेल, यवतमाळ तालुक्यात १५गावांमध्ये १६ विहिरी, पांढरकवडा तालुक्यात ६ गावांमध्ये २ बोअरवेल,४ विहिरी तर बाभुळगाव तालुक्यात २ गावांमध्ये २ विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
अजून मे महिन्याचे १५ दिवस तर जून महिना पूर्णत: बाकी आहे,अशा परिस्थितीमध्ये मान्सूनचा समाधानकारक पाऊस होत नाही, तोपर्यंत पाणी टंचाईचे संकट जिल्ह्यात कायम राहणार आहे. अशा परिस्थितीमध्ये (Well Acquisition) पाणी टंचाईची तिव्रता अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.