अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी पोलिस प्रशासनाचे आवाहन!
परभणी (WhatsApp Controversy) : परभणीच्या पालम तालुक्यात मोबाईलवर ठेवलेल्या व्हॉट्सअॅप समाजमाध्यमात (Social Media) स्टेटसवरुन या विषयावर मागील दोन दिवसांपासून आपआपली बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला. यात श्रेष्ठत्वाच्या मुद्यावर वाद होऊन पालम शहर शनिवार ११ ऑक्टोबर रोजी अचानक बंद करण्यात आले. त्यानंतर समाजमाध्यमावर विविध अफवांना पेव फुटले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पो.नि.एस.के. खटाणे यांनी केले आहे.
एका गटाच्या युवकांच्या वतीने पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन!
समाजमाध्यमावरील चर्चेने वाद होऊन लहान मुलांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला. त्यात शनिवार ११ ऑक्टोबर रोजी काही युवकांनी आठवडी बाजारात जात मार्केट बंद केले. वाद करणार्यांना तातडीने ताब्यात घेऊन कारवाई (Action) करावी या मागणीसाठी एका गटाच्या युवकांच्या वतीने पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. अचानक बाजारपेठ बंद झाल्याने बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांची (Citizens) धावपळ उडाली. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांनी पालम गाठून परिस्थितीचा आढावा घेतला. कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी अधिकची कुमक मागविण्यात आली. सध्या पालम शहरात शांतता आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक मंजुषा मोरे, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लोखंडे, शिवकांत नागरगोजे यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तात तैनात आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस प्रशासनाला (Police Administration) सहकार्य करावे, शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखावी असे आवाहन पो.नि. एस.के. खटाणे यांनी केले आहे. पालम शहरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून सध्या शहरात शांतता आहे.