Washim crime :- मंगरूळपीर तालुक्यातील दाभा येथील एका व्यक्तीने दिनांक 15 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजताचे सुमारास पत्नीच्या डोक्यात दगड मारून जखमी केले आहे. या प्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा (Crime) दाखल केला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी जयबाई बबलू भुसारे वय २३ रा दाभा यांनी फिर्यादीत नमूद केले फिर्यादीचा पती बबलू नंदलाल भुसारे दारू पिऊन आला व काहीही कारण नसताना फिर्यादीला शिवीगाळ(Abusing) करू लागला व जीवाने मारण्याची धमकी देत होता म्हणाला की तू काही कामधंदा करत नाही तू घरात बसून राहते असे म्हणून त्याने त्याच्या हातातील मोठा दगड घेतला व फिर्यादीच्या डोक्यात मारला. त्यामुळे डोके फुटून रक्त निघाले. अशा जबानी रिपोर्ट वरून सदरचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉ. डिगंबर राठोड करीत आहे