अंकुरलेले पिके नष्ट होण्याच्या मार्गावर!
बार्शी टाकळी (Wild Animals) : बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडगाव शेत शिवारात अंकुरलेले पिके वन्य प्राण्यांच्या (Wild Animals) हैदोसामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर ते महान रस्त्यावर असलेल्या भेंडगाव शिवारातील शेतकऱ्यांनी (Farmers) काही दिवसापूर्वी शेतात सोयाबीन कपाशी तूर मुंग उडीद अशा पिकाची पेरणी केल्यानंतर, सदर पिके अंकुरलेली असताना, जंगलातील रोहि, काळवीट, रानडुक्कर, नीलगाय, हरणे माकडे असे विविध प्रकारचे वन्य प्राणी यांचा 25 ते 40 ,50 संख्या असलेला कळप यांचाशेतात मुक्त संचार असल्याने शेतात अंकुरलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेताच्या पिकाचे रक्षण करण्याकरिता शेतकरी रात्रंदिवस शेतात (Farm) उपस्थित असला तरी सदर प्राणी शेतकऱ्यांना काही जुमानत नसल्याच्या घटना घडत आहेत.
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी!
शासनाने (Government) किंवा वनविभागाने (Forest Department) शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान (Crops Damage) होणार नाही. याकरितावन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा. तसेच शासनाने शेतकऱ्यांच्या शेताला तारांचे किंवा जाळीचे कुंपण करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी. असे मत करण इंगोले यांनी व्यक्त केले.