आ. रामदास मसराम यांनी जाणल्या शेतकर्यांच्या समस्या
आरमोरी (Wild Elephants) : ओडिशा राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दाखल झालेल्या रानटी हत्तींच्या कळपातील तब्बल २८ हत्तींनी (Wild Elephants) गेल्या दोन दिवसापासून आरमोरी तालुक्यातील पळसगांव, मंजेवाडा, शंकरनगर परीसरात हैदोस माजवून मोठया प्रमाणात नुकसान केले आहे. या बाबीची माहिती मिळताच आ. रामदास मसराम (MLA Ramdas Masram) यांनी परीसरात भेट देऊन शेतकर्यांच्या समस्या जाणुन घेतल्या.
५ डिसेंबर २०२१ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात २२ हत्तीचा कळप दाखल झाला होता. गेल्या ४ वर्षाच्या कालावधीत या (Wild Elephants) हत्तींची संख्या वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून देसाईगंज तालुक्यातील डोंगरगांव हलबी रस्त्याने आरमोरी तालुक्यातील पळसगांव येथे दाखल होऊन शेतकर्यांचे धान, भाजीपाला साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. त्या नंतर त्यांनी काल मंजेवाडा, शंकरनगर येथे रात्री हैदोस घालुन मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
देवका मेश्राम, दिनकर मने , शामराव लिंगायत, बिदान मंडल, निर्मल मिस्त्री गौरग मिस्त्री ,रेखा परदार यांसह अनेक शेतकर्यांचे नुकसान केले. या बाबीची माहिती मिहळताच आ. मसराम यांनी भेट देऊन शेतकर्यांच्या समस्या जाणुन घेतल्या. आ. रामदास मसराम (MLA Ramdas Masram) यांनी उप वनसंरक्षक यांना हत्तीच्या कळपाचा बंदोबस्त करुन झालेले नुकसान तातडीने देण्याच्या सुचना केल्या. अजुनही हत्तीचा कळप मंजेवाडा, शंकरनगर जंगल परीसरात असल्याची बाब समोर आल्याने आ. मसराम यांनी वनपरिक्षेत्राधिकारी बडोले यांना वनविभागाच्या वतीने गस्त करण्याच्या सुचना केल्या.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम , सरपंच जयश्री दडमल ,काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव राऊत, भेनेश्वर अंबादे , राजेंद्र मने , मोतीलाल लिंगायत ,शालिक मेश्राम,शैलेश कुमरे ,देवनाथ झलके कीर्तीलाल पुराम यांसह असंख्य नागरिक व शेतकरी उपस्थित होते.