Maharashtra Legislative Assembly:- महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 विधानसभा जागांसाठी 20 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान (voting)होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी निवडणुकीची तारीख जाहीर केली. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडीची थेट लढत विरोधी महाविकास आघाडीशी होणार आहे.
महायुती आघाडीची थेट लढत विरोधी महाविकास आघाडीशी होणार..!
आपला पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही युतीसोबत लढणार नसून स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) भाजपचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एनडीए आघाडीला पाठिंबा दिला होता आणि राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि महायुतीच्या नेत्यांचा प्रचारही केला होता. राज ठाकरेंनी लावला पूर्णविराम राज ठाकरे यांनी बुधवारी (16 ऑक्टोबर) पत्रकारांशी बोलताना ही घोषणा केली आणि मनसे इतर पक्षांपेक्षा जास्त जागा लढवण्याच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला. राज ठाकरे म्हणाले, “आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवू. निवडणुकीनंतर मनसे सरकारमध्ये असेल. सर्व राजकीय पक्षांमध्ये मनसे जास्तीत जास्त जागा लढवेल.”