हिंगोली (Women Ghagar Morcha) : तालुक्यातील बेलुरा येथे गावकर्यांना शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी मिळत नसल्याने भर पावसाळ्यात भटकती करावी लागत असुन शुध्द पाणी मिळावे यासाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर १६ सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली घागर मोर्चा (Women Ghagar Morcha) काढुन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदन नमूद केले आहे की, हिंगोली तालुक्यातील बेलुरा येथे भर पावसामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी गावकर्यांना भटकावे लागत आहे. गावात झालेले दुषित पाणी पिल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. (Women Ghagar Morcha) पिण्यासाठी शुध्द पाणी नसल्यामुळे मुतखडा या रोगाचे प्रमाण वाढले आहे.वारंवार तक्रारी करन सुध्दा केवळ आश्वासन मिळत आहे.
गावात जलजिवन मिशनचे काम पुर्ण झाले नाही. त्यामुळे ऐन पावसाळयामध्ये सुध्दा (Women Ghagar Morcha) पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावात शुध्द पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे.