Washim Crime :- तालुक्यातील गिरोली सर्कलमधील भिलडोंगर गावातील समस्त महिला भगिनीनी गावातील अवैध दारूविक्री (Illegal sale of liquor) आणि बेकायदा वरली मटका जुगाराला आळा घालून नवीन पिढीला वाचवण्याचे मोठे पुण्याच काम दारू बंदी अन्न शुल्क विभाग ( Food Excise Department) व पोलीस प्रशासनाने करावे, असे निवेदन दि. २५ जून रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना महिलांनी दिले आहे.
नवीन पिढीला वाचवण्याचे मोठे पुण्याच काम दारू बंदी अन्न शुल्क विभाग व पोलीस प्रशासनाने करावे
निवेदनात नमूद केले आहे की, मौजे भिलडोंगर येथे देशी व विदेशी दारू खुलेआम राजरोसपणे सुरू असुन गावाला लागून असलेल्या गीराट येथे हातभट्टीची दारू सहजरित्या मिळत आहे. दारुडे दारू ढोसून अर्वाच्या भाषेत मुलीची छेड काढतात. त्यामुळे शाळकरी मुले, मुली रस्त्यावरून जाण्यासाठी धजावतात. दारू सेवन केल्यावर गावातील गुंड सामान्य नागरिकांना मारण्याची कापण्याची धमकी देतात, याबाबत वारंवार पोलिसांना कळवून सुद्धा करवाही होत नाही, आतापर्यंत दारूमुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून गावातील तीन लोकांना दारुपायी जीव गमावण्याची पाळी आलेली आहे. भिलडोंगर गावात देशी विकली जाते गिराटा येथे हात भटी सरास विकली जात आहे, जुगार पण मोठया प्रमाणात सुरू आहे. तात्काळ अवैध दारू व जुगार बंदीसाठी कारवाई करावी, असे निवेदन महिला बचत गटाच्या महिलांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
निवेदन देतेवेळी अनुसया पवार, माला पवार, सीमा राठोड, बेबी सस्ते, गुंफा पवार, मीरा पवार, गेना पवार, सरपंच चिंतामण खुळे, प्रवीण पवार ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील पवार, विनोद राठोड इत्यादी सर्व सामान्य नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.




