आले जनतेच्या मना तेथे कोणाचे चालेना.!
बार्शीटाकळी (Women sarpanch Disqualified) : बार्शीटाकळी तालुक्यातील गट ग्रामपंचायत जनुना वडाळा गावातील, थेटजनतेतून निवडलेल्या महिला सरपंच यांचा अर्ज नामंजूर करत, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी त्यांना सरपंच पदावरून अपात्र केले आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील जनुना वडाळा गावात गट ग्रामपंचायत आहे. दिनांक20 डिसेंबर 2022 ला ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत नलिनीताई मखराम राठोड या थेट जनतेतूनसरपंच पदावर निवडून आल्या होत्या. यावेळी (Women sarpanch Disqualified) गावातील आठ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते. त्यामधून विजय राठोड यांची उपसरपंच पदावर निवड झाली होती.
सरपंच नलिनी राठोड यांच्या विरुद्ध बार्शीटाकळीचे तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी यांचे दिनांक 24 फेब्रुवारी 2025 ला उपसरपंच विजय राठोड, रोहित पवार, संजय पवार, दयाराम घोडे, बुगाबाई पवार, मीराताई जाधव, यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. दिनांक 27 फेब्रुवारीला एका सभेत 3/4 मताने अविश्वास प्रस्ताव पारित झाला होता.
जनतेतून थेट निवडलेल्या (Women sarpanch Disqualified) सरपंचाला पदावरून , काढण्याकरिता दिनांक12 मार्च 2025 ला ,या गावातील नंदकिशोर संस्थान येथे बार्शीटाकळी तहसीलदार वजीरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेषग्रामसभेचे आयोजन आयोजन केल्यानंतर सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा एक गट व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा दुसरा गट असे विभाजन यावेळी केले होते. यावेळी मतदान प्रक्रियेत भाग घेण्याकरिता 530 लोकांनी नोंदणी केली होती. यावेळी हात उंच करून शीर गणना केली असता सरपंच नलिनीताई राठोड यांच्या विरोधात 271 मते तर त्यांच्या बाजूला 247 मते मिळाली होती. यावेळी सरपंच यांच्याविरोधात निकाल जाहीर केला असता,त्यांनी उच्च न्यायालयाच्या सुनावणी बाबत माहिती दिली होती.
यानंतर दोन्ही गटांनी एक दुसऱ्यांच्या विरोधात माननीय न्यायालय संबंधित अधिकारी यांच्याकडे आपले म्हणणे सादर केले होते. अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिनांक 13 ऑक्टोबरला सरपंच यांनी 29 ऑगस्ट 2025 चा केलेला अर्ज नामंजूर केला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम (3-ब) अन्वये जनुना वडाळाच्या सरपंच नलिनी मकरंद राठोड यांना अपात्र केले. अखेरजनतेतून थेट निवडलेल्या सरपंचाला पदावरून काढण्यात आले.