भारतीय व महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी अभिमानास्पद बाब!
कळमनुरी (World Heritage) : युनेस्को संघटनेने (UNESCO Organization) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांचा (Forts) समावेश जागतिक वारसा म्हणून घोषीत केले आहे. त्या अनुषंगाने कळमनुरी येथील नगर परिषद (City Council) प्रांगणातील रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून जयघोष करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या कार्य कीर्तीची नोंद जागतिक यादीत नोंद होणे ही भारतीय व महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे. यावेळी डॉ.एल.डी. कदम, चंद्रकांत देशमुख, संतोष सारडा, विठ्ठल भोयर, ॲड. विठ्ठल माखणे, ॲड. तातेराव देशमुख, ॲड. उमेश जिंतूरकर, ॲड. प्रदिप तडस, अरुण वाढवे, अरविंद पाटील, संजय वाढवे, विलास कऱ्हाळे, गंगाधर सातव, चांदू भिसे, अक्षय ढगे, हरीश नरवाडे, अश्विन बोरकर, सुरज देशमाने, ॲड. गुणानंद पतंगे यांची उपस्थिती होती.