कळमनुरी तालुका व शहर मराठी पत्रकार संघाचा उपक्रम!
कळमनुरी (World Photography Day) : जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त कळमनुरी तालुका व शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने दि.19 ऑगस्ट रोजी कळमनुरी शहरातील सर्व छायाचित्रकारांचा सत्कार (Photographers Felicitated) करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन स्टेट बँकेच्या शाखाधिकारी अर्चना कसबे ह्या उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल हे उपस्थित होते. यावेळी कळमनुरी शहरातील छायाचित्रकार प्रकाश पाईकराव, राजेश पेटकर, मुकिंदा पंडित, विजय बलखंडे, संतोष पाईकराव, शिवाजी नानवटे, अनवर नाईक, संजय शितळे, प्रदीप मस्के, प्रसाद इंगळे, शेख तस्लिम, बालाजी पाणबुडे, सय्यद तौफिक, शिवाजी मोहळे, अन्सार पठाण, प्रणव मोडक, अंकुश नरवाडे, प्रवीण देगावकर आदींचा छायाचित्रकार दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अलीमोद्दीन कादरी, तालुका सचिव मुजीब पठाण, म.रफिक आदींनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शहराध्यक्ष सौरभ साकळे यांनी मांडले.