वसमत (Car Fire) : वसमत येथील सोमवार पेठ भागातील गणपती मंदिरासमोर लावलेली कार बुधवारी मध्यरात्री नंतर अचानक पेटली कार जळत असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले पोलिसांनी अग्निशामक दल व नागरिकांच्या मदतीने आग विझवली आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे मात्र या प्रकरणी गुरुवारी उशिरापर्यंत कोणी तक्रार देण्यासआले नव्हते त्यामुळे पोलिसांना तक्रारीची नोंद नाही.
वसमत येथील गणेश पेठ गणपती मंदिर समोर उभी असलेल्या कारला बुधवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास (Car Fire) आग लागली आगीचे लोळ उठल्याने परिसरातील रहिवाशी नागरिकांच्या लक्षात आले. भीषण आग लागली होती नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले पोलीस निरीक्षक सुधीर वाघ गजानन भोपे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटना असे दाखल झाले होते पोलीस परिसरातील नागरिक व अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझवण्यात आली आगीत कारचे मोठे नुकसान झाले आहे.
सोमवार पेठ भागातील रहिवाशी सुनील वाघमारे यांची ही कार असून कारचा क्रमांक एम एच 12 जेएम 73 93 असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे कारचे मालक बाहेरगावी गेलेले असल्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आलेली नाही. घरासमोर उभ्या असलेल्या कारला मध्यरात्री नंतर अचानक आग कशी लागली (Car Fire) कार जाळली का जळाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही कार मालकाच्या तक्रार नंतर पोलीस तपासात हे निष्पन्न होणे अपेक्षित आहे…




