विद्यार्थ्यांसह नागरिकांना शोधावा लागतो पुरातून मार्ग
रस्त्याची बांधणी करा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा
लाखांदूर (Sarandi Flood) : एक दोन नव्हे तर चक्क साठ सत्तर वर्ष तथा तीन पिढ्यापासुन वास्तव्यास असलेल्या सरांडी बु.च्या हेटी वरील बारा ते तेरा कुटुंबीयांना रस्त्यावर पुरच पूर असल्याने (Sarandi Flood) पुराच्या कमरेभर पाण्यातून वाट शोधावी लागत असल्याने भीषण संकट ओढवले आहे. पाऊस असो की नसो,या रस्त्यावर मात्र सदैव पूर सदृश्य स्थिती असल्याने दररोज विद्यार्थी तसेच महिला पुरुषांना कमालीचा त्रास सहन करावा लागत. त्यामुळे मायबाप शासन लक्ष देईल काय असा प्रश्न विचारीत आहेत.
लाखांदूर तालुक्यातील सरांडी बु.येथील हेटीवर बारा तेरा कुटुंब वास्तव्यास राहतात. गावापासून दिड ते दोन किमी सरांडी/बु.- हेटी ते ढोलसर रोडपर्यत रस्त्याचे एकदा खडीकरण झाले. मात्र परिसरातील शेतातील पाणी सदर रस्त्यावर (Sarandi Flood) जमा होत असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासन, प्रशासनाचे लक्ष नसल्याने त्याचा फटका सामान्य जनतेला पोहचत आहे. दरम्यान रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख विनोद ढोरे यांनी दिला आहे.
सदर सरांडी/बु.- ढोलसर या दीड ते दोन किमी अंतराचे रस्त्यावर एक किमीचे आत अंतरावर हेटी म्हणून ढोरे कुटुंबीय सत्तरचे वर वर्षांपासून वास्तव्यास आहे. सदर कुटुंब तीन पिढ्यांपासून लोकप्रतिनिधी म्हणून मुख्य पदावर राजकारणात सक्रिय मात्र स्वत: राहत असलेल्याच रस्त्याकडे दुर्लक्ष का? असे ग्रामस्थांचे बोलण्यातून ऐकण्यात येत आहे. गावातील कोणताच रस्ता या प्रकारच्या दयनिय अवस्थेत दिसत नाही.
रस्ताला पुरच पूर व खड्डेच खड्डे असून संपूर्ण चिखलमय अशी दयनिय अवस्था हल्ली या रस्तांची झाली असून लहान शाळकरी मुलांना व ढोरे कुटुंबीयासह गावातील शेकडो शेतकर्यांना याच (Sarandi Flood) रस्तांने अतिशय संघर्षमय प्रवास करावा लागत आहे. करीता शासन-प्रशासन व संबंधित लोकप्रतिनिधींनी या समस्यांची गांर्भियाने दखल घ्यावी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी ढोरे कुटुबीयांसह ग्रामस्थांकडूनही केली जात आहे.