हिंगोली (NCP Youth Congress) : राष्ट्रवादी युवक काँग्रेस हिंगोली शहर व हिंगोली विधानसभा क्षेत्राची बैठक शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे शनिवारी 5 एप्रिल रोजी हिंगोली युवक शहराध्यक्ष स्वप्निल इंगळे यांच्या नेतृत्वात पार पडली यावेळी अनेकांच्या निवडी देखील जाहीर करण्यात आल्या यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या हिंगोली शहर कोषाध्यक्षपदी शेख नईम शेख करीम तर (NCP Youth Congress) हिंगोली युवक शहर संघटक पदी मोहसीन मोहम्मद मोहसीन खाजा यांची निवड करून त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे (NCP Youth Congress) हिंगोली जिल्हाध्यक्ष बि.डी बांगर, राष्ट्रवादीचे युवक प्रदेश सचिव सुजय देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर ,हिंगोली शहराध्यक्ष केशव दुबे, रवि डोरले ,युवा नेते सुरज वडकुते ,महेश थोरात, चक्रधर जगताप ,ओम् अवचार, करन कल्याणकर, समीर शेख ,जुनेद खान, रितेश शाहू ,तेजस पवार ,शेख हनीफ, विशाल काळे, इमरान लाला, करण कल्याणकर यांच्यासह (NCP Youth Congress) राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.