नवीन तंत्रज्ञानासह ऊस लागवड करण्याचे आवाहन
वसमत (Purna Sugar Factory) : पूर्णा साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. या (Purna Sugar Factory) सभेला कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आमदार राजू पाटील नवघरे यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, शेतकरी सभासद कामगार मोठ्या संख्येने भागधारक उपस्थित होते. यावेळी नवीन तंत्रज्ञानासह ऊस लागवड करून उत्पन्न वाढ करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जयप्रकाश दांडेगावकर यांनी केले.
वसमत येथील (Purna Sugar Factory) पुर्णा सहकारी साखर कारखान्याची 47 वी सर्वसाधारण सभा पार पडली सभेचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. सुनिल कदम यांनी केले. कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री जयप्रकाश दांडेगांवकर साहेबांनी विषयपत्रिके प्रमाणे एक – एक विषय सभेपुढे मांडले त्या सर्व विषयांना सभेने मान्यता दिली. आपला ऊस आपल्याच पुर्णा कारखान्याला देऊन कारखान्याचे ऊस गाळपाचे उद्दीष्ट पुर्ण होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. तसेच भविष्यात आयI (कृत्रिम बुध्दीमत्ता) तंत्रज्ञानाचा उपयोग ऊस शेतीमध्ये करुन ऊसाचे उत्पादन वाढीसाठी कारखान्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या ऊसविकास योजनेमध्ये सभासदांनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन दांडेगावकर यांनी केले.

यावेळी आमदार राजू पाटील नवघरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ऊस उत्पादक शेतकरी व उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अतिवृष्टी व ढगफुटीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री गणेशराव दुधगांवकर, माजी आमदार पंडीतराव देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे, जेष्ठ सभासद भगवानराव आलेगांवकर, महाराष्ट्र राज्य बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक बेडसे व बँक स्थायी अधिकारी राऊत, कारखान्याचे सर्व संचालक, प्र.कार्यकारी संचालक के.पी. आकुसकर व सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत खेळी-मेळीच्या वातावरणात सभा संपन्न् झाली संचालक शहाजी देसाई यांनी आभार मानले.
नुकसानीची भरपाई मिळेल…
आमदार राजू पाटील नवघरे यांनी मार्गदर्शन करताना वसमत तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व ढगफुटी यातून प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळून देण्यात येईल अशी आश्वासन दिले निसर्गामुळे ओढवलेल्या या संकटाचा सामना करताना आपण शेतकऱ्यांसोबत आहोत असे सांगितले शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे नुकसान भरून येणार नाही. मात्र या नुकसानीची भरपाई करून देण्यासाठी शासन स्तरावर शंभर टक्के प्रयत्न करून त्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळेल. असा शब्द यावेळी दिला चांगले पीक आलेले असताना निसर्गाने घात केला. आगामी काळात नदी ओढे यांच्या लगत असलेल्या शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी पशुधन सांभाळावे, असे आवाहन केले.




