यवतमाळ (Yawatmal) :- राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. प्राथमिक शाळांमध्ये मराठी सक्ती असली तरी हिंदी भाषा (Hindi Language) देखील पर्यायी तिसरी भाषा म्हणून ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणामध्ये त्रिसूत्री स्वीकारल्यामुळे मराठी व इंग्रजीनंतर तिसरी पर्यायी भाषा म्हणून हिंदी ठेवण्यात आली आहे. मात्र चिमुकल्या मुलांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. याविरोधात व ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे.
चिमुकल्या मुलांवर हिंदी लादण्याचा प्रयत्न महायुती सरकार करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला
याविरोधात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने २९ जुन रविवारी रोजी दुपारी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रविण शिंदे, किशोर इंगळे, संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखाली हिंदी भाषा सक्तीच्या जिआर पेटवून त्या शासन निर्णयाची होळी शहरातील दत्त चौकात शिवसैनिकांनी केली . व शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली या वेळी दत्त चौक परिसर घोषणांनी दणाणून गेला होता यावेळी तालुका प्रमुख गजानन पाटील, गोपल चव्हाण , तालुका प्रमुख नितीन माकोडे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख कल्पना दरवई, खुशाल मिसाळ, अजय गाडगे, संतोष कुचनकर, शरद ठाकरे, सागर धवने, सचिन माकोडे, कुशल बोकडे, दिगांबर मस्के, विनोद पवार, विकास पवार, साजीद अब्दुल रहेमान, नंदा भिवगडे, प्रतिभा हरणखेडे, राधीका चव्हाण, राजु कोहरे, सचिन बारसकर, बबलू शहा, सुनील कटकुळे, राजु नागरगोजे, संतोष गदि, गणेश आग्रे, दिनकर भवरे, आसिफ अली काझी, गजानन खोडनकार, विनोद ढुमने व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते