परभणीच्या ग्रामीण पोलिसात अपहरणाचा गुन्हा नोंद!
परभणी (Young Corpse) : परभणीतील सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे कॅनलच्या जवळ रविवार 13 जुलै रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. ओंकार बन्सीधर गायकवाड रा. संबर, ता.जि. परभणी असे मयत तरुणाचे नाव असून, परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात (Parbhani Rural Police Station) मयताच्या पित्याने मुलाचे अहपरण केल्याची तक्रार 12 जुलै रोजी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे तरुणाच्या मृत्यूाबाबत उलट सुलट चर्चा होत आहे.
मृत्यूबाबत उलट सुलट चर्चा?
याबाबत समजलेली माहिती अशी की, परभणी जवळ असलेल्या संबर येथील ओंकार बन्सीधर गायकवाड या तरुणाचे सेलू-देवगाव फाटा महामार्गावर मोरेगाव परिसरात असलेल्या कॅनल जवळ रविवारी प्रेत आढळले. घटनेची माहिती पोलीसांना कळताच प्र. पोनि. संजय चव्हाण, पोउपनि. बलभीम राऊत, पोह. विष्णुदास गरुड, पोह. अजय राजकटला, पोह. नितीन राठोड, जगन्नाथ मुंढे, माधव कांगणे, पोलीस पाटील तुळशीदास मगर यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे. दरम्यान पोलीसांनी मृतदेहाची ओळख पटविली असून परभणी जवळ असलेल्या संबर येथील ओंकार बन्सीधर गायकवाड असे मयताचे नाव असल्याचे निष्पन्न झाले आहे.
तिघा जणाविरुध्द विविध कलमानुसार गुन्हा दाखल!
दरम्यान, संबर हे गाव घटनास्थळापासून दूर आहे. मयताच्या अंगावरील जखमा व फाटलेली पॅन्ट या अवस्थेत आढळून आल्याने ओंकार गायकवाडच्या मृत्यू बाबत उलट सुलट चर्चा होत आहे. नेमके कारण मात्र पोलीस तपासानंतरच निष्पन्न होणार आहे. दरम्यान परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात मयताचे वडिल बन्सीधर देवराव गायकवाड यांनी 12 जुलै रोजी तक्रार दिली आहे. या तक्रारीत नमुद करण्यात आले की, पप्पु वैद्य रा. बोबडे टाकळी व इतर तीन इसमानी ओंकार गायकवाड यास जि.प. शाळेजवळ बोलावून घेतले. तुला दिलेले पैसे परत का देत नाहीस? म्हणून आरोपीनी ओंकार यास पांढर्या रंगाच्या कारमध्ये टाकून त्याचे अपहरण केल्याची तक्रार दिली आहे. यावरुन पप्पु वैद्य व इतर तिघा जणाविरुध्द विविध कलमानुसार गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.