भद्रावती (Chandrapur) :- तालुक्यातील भटाळी येथील तरुण शेतकर्यांने कर्जबाजारीपणामुळे विष (Poison) प्राशन करून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली.संजय महादेव ढवळे (५०) असे मृत शेतकर्याचे नाव आहे. भटाळी येथील शेतकरी संजय महादेव ढवळे यांच्यावर अनेक संस्थेचे कर्ज होते. ते फेडता येणे शक्य नसल्याने त्यांची मानसिक स्थिती ढासळली. यातूनच दि. १० जून रोज मंगळवारला त्यांनी विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान काल दि. १५ जून रोज रविवारला सायंकाळी चार वाजता च्या सुमारात संजय ढवळे यांची प्राणज्योत मालवली. संजय ढवळे यांच्या निधनामुळे त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि वडील त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. संजय ढवळे यांच्या मुलीचे लग्न मागच्या वर्षी झाले. तसेच मुलाचे लग्न दि. २० एप्रिल रोजी झाले. दरर्षीच्या शेत हंगामात नापिकी होत असल्याने कर्ज वाढत गेल्याने ढासळलेल्या मानसिक स्थितीतून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले