Chimur torture news :- मागील तिन वर्षांपासुन युवतीला प्रेम जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार (torture) केले व ९ ऑगस्ट रोजी युवतीचे अश्लील व्हिडीओ(obscene videos) बनवून इंस्टाग्राम (Instagram) वर अपलोड करणार्या आरोपीला पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन भिसी पोलीसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव राकेश वैâलास चौधरी (२२) असे आहे.
अत्याचार, अॅक्ट्रॉसिटासह विविध गुन्हे दाखल
भिसी पोलीस ठाण्याअंतर्गत येणार्या वाढोणा येथील राकेश कैलास चौधरी याचे गावातीलच एका १९ वर्षीय युवतीशी प्रेमसंबंध (love affair) जुळले. मागील तिन वर्षांपासुन तो युवक प्रेमाच्या नावाखाली युवतीवर अत्याचार करीत होता. दरम्यान आरोपी युवकाने पिडीत युवतीला न सांगता तिचे अनेक अश्लील व्हीडीओ बनविले. नंतर अनेकदा अश्लील व्हीडीओ चा धाक दाखवून अत्याचार केला.आरोपीने युवतीचे अश्लील व्हीडीओ इंस्टाग्राम वर अपलोड करून युवतीची बदनामी केली. सदर बाब युवतीच्या लक्षात येताच युवतीने आपल्या पालकांना सोबत येऊन आरोपी राकेश विरुध्द भिसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. भिसी चे ठाणेदार मंगेश भोंगाडे, सह.उपनिरीक्षक रविन्द्र वाघ व सह.उपनिरीक्षक थिटे यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेता लगेच वाढोना गावातून आरोपीला अटक केली. भिसी पोलीसांनी आरोपी विरूध्द बलात्कार, अॅक्ट्रॉसिटी सह विविध कलमाअंतर्गत गुन्हा नोंदविला. सदर गुन्ह्याचा पुुढील तपास ब्रम्हपुरी चे उपविभागीय अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.