आखाडा बाळापूर (Youth commits suicide) : कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर येथील युवकाने गरीबीला कंटाळून नैराश्येतून गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी याबाबत आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील सुकळीवीर येथील (Youth commits suicide) संतोष माधव खोकले वय २०वर्षे या युवकाने गरीबीला कंटाळून १८सप्टेंबर रोजी सुकळीवीर शेतात चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. २० सप्टेंबर रोजी माधव खोकले माहितीनुसार अकस्मात मृत्यू नोंद करून घटनास्थळी डोंगरकडा पोलीस चौकी प्रमुख संतोष नागरगोजे, विठ्ठल जाधव यांनी भेट दिली.