लाखांदूर (Youth committed suicide) : तालुक्यातील ढोलसर येथे आज दि.३ ऑगस्ट रोज रविवार ला दुपारी २.३० चे दरम्यान एका तरुण युवकाने स्वत:चे राहते घरी गळफास घेवुन (Youth committed suicide) आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
सदर गळफास घेवून आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव एकनाथ अशोक बागडे (२३) असून कुटुंबात आई व मृतक युवक असे दोनच व्यक्ती राहत असून त्याची आई शेतावर केली असता दुपारचे सुमारास घरी कुणीच नसल्याचे पाहुन राहत्याघरी हॉलमध्ये गळफास घेवून (Youth committed suicide) आत्महत्या केली. त्याची आई शेतावरुन घरी परतल्यानंतर दार खोलून बघते तर मुलगा एकनाथ दोरखंडाला लटकलेला दिसताच आईने दु:खद हंबरडा फोडला व ग्रामस्थ घटनास्थळी गर्दीने गोळा झाली.
घटनेची माहिती लाखांदूर पोलीस स्टेशनला दिली असता लाखांदूरचे पोलिस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनात पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाली. सदर घटनेचा पंचनामा करुन शव शवविच्छेदनगृह लाखांदूरला रवाना केले. सदर (Youth committed suicide) आत्महत्तेचे कारण सध्या कळले नसून पुढील तपास लाखांदूरचे पोलिस प्रशासनाकडून सुरु आहे.