व्याडची घटना
रिसोड (Youth committed suicide) : रिसोड तालुक्यातील व्याड येथे एका 25 वर्षीय युवकांने आपल्या स्वतःच्या किराणा दुकानांमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 27 मे रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली.शिवाजी गजानन बोंडे वय 25 वर्षे असे मृतकाचे नाव असून 26 मे च्या रात्री दरम्यान त्याने गळफास लावल्याची माहिती मिळाली याबाबत माहिती अशी की, रिसोड तालुक्यातील व्याड येथे गावात किराणा दुकान चालवत असलेल्या पंचवीस वर्षीय शिवाजी गजानन बोंडे यांने आपल्या किराणा दुकानातच 26 मे च्या रात्री (Youth committed suicide) गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रिसोड येथे शिवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आला. (Youth committed suicide) आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही