परळी ते तपोवन रस्त्यावरील घटना
ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
हिंगोली (Youth Death Case) : वसमत तालुक्यातील परळी ते तपोवन मार्गावर भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत एका तरुण शेतकर्याचा मृत्यू झाल्याने चालकाविरुध्द २९ जूनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, वसमत तालुक्यातील तपोवन येथील तरुण शेतकरी शुभम उत्तम कदम (२२) हे शनिवारी २८ जूनला शेतातील काम आटोपून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गावाकडे पायी येत होते. यावेळी परळी ते तपोवन मार्गावर भरधाव ट्रॅक्टरने त्यांना पाठीमागून धडक दिल्यानंतर चालकाने ट्रॅक्टरसह पलायन केले. या (Youth Death Case) अपघाताची माहिती ग्रामस्थांना मिळताच शुभमला तात्काळ परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहिर करण्यात आले.
या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी हट्टा पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दाखल (Youth Death Case) करून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या संतप्त भावना लक्षात घेवून सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव यांनी ग्रामस्थांना शांत केले. रविवारी पहाटेच्या सुमारास हट्टा पोलिस ठाण्यात प्रभाकर कदम यांनी रितसर तक्रार दिली.
ज्यामध्ये शुभम कदम यास पाठीमागून ट्रॅक्टरने धडक देवून त्यास गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक पंढरी दशरथे याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या (Youth Death Case) प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव करीत आहेत.