सालई खुर्द (Youth Death) : पाण्याची मोटार सुरू करण्यास गेलेल्या युवकाला शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. २९ मे रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. (Youth Death) विनोद मळगू मांढरे (३६) रा.सालई खुर्द ता.मोहाडी असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
रामटेक-तुमसर रस्त्यालगत शेतात घराचे बांधकाम सुरू आहे. घरावर पाणी मारण्यासाठी जवळच असलेल्या टाकीमध्ये मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या युवकाला जबर शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला. विनोदने मोटार सुरू का केली नाही म्हणून पाहण्यासाठी कुटुंबीय गेले असता, तो (Youth Death) निपचित पडल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, भाऊ असा बराच मोठा आप्त परिवार आहे.