यवतमाळ (Yawatmal) :- शहरालगत असलेल्या भोसा येथील तलावाच्या ठिकाणी पोहायला गेलेल्या एका युवकाचा तलावात बुडवून दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली आहे. शंकर परसराम दोडके (२५) पारवा, भोसा तलाव या ठिकाणी पोहायला गेला असता पाण्यात बुडून मृत्यू झालेला आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या टिमने शंकर दोडके याचा मृतदेह (dead body) पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत तलावातून बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पावसाळ्याच्या दिवसात तलाव, नदी नाल्याकाठचा परिसर तुडूंब भरून वाहत असल्याने या ठिकाणी जाणे टाळणे गरजेचे झाले आहे.
अर्ज भरण्यासाठी हजारो बेरोजगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जमाव
यवतमाळ : यवतमाळ जिल्हा प्रशासनाने नागरिकांना गावात महसुलाच्या (revenue) सेवा उपलब्ध व्हाव्या म्हणून गाव तिथे सेतू केंद्र उघडण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात २३०० सेतू केंद्र उघडले जाणार आहे. सदर २३०० सेतु केंद्रासाठी शुक्रवारपर्यंत दोन हजार ६८ अर्ज दाखल करण्यात आले. आज सोमवारी १६ जून रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी हजारो बेरोजगार दाखल झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालया परिसरात एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले.त्यातून जिल्हा प्रशासनाची नियोजन शुन्यता चव्हाटयावर आली आहे. ‘गाव तेथे सेतू केंद्र’साठी आज शेवटी तारीख होती परंतु अर्ज भरण्यासाठी झालेली गर्दी, बेरोजगारीचे प्रमाण पाहता बरेच जण अर्ज करण्यापासून वंचित राहत आहेत. अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र जमा करण्यासाठी अर्जदारांचा खूप वेळ गेला. सदर मोहिमे अंतर्गत बारावी पात्र उमेदवारांना यासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे.
याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड (PAN card) ज्या जागी केंद्र उभे करणार त्या ठिकाणची टॅक्स पावती पावती बंधनकारक आहे. या सर्व अर्टीची अर्जदार पूर्तता करत असून अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये प्रचंड गर्दी झाली. त्यातून सावळ्या गोंधळाची स्थिती निर्माण झाली. झालेली गर्दी पाहता अनेकजण या शासनाच्या महत्वकांक्षी मोहिमेतून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.