महामार्गावरील अर्धवट काम, गडचांदूर-राजुरा रस्त्यावरील घटना
राजुरा (Bike Accident) : गडचांदूर-राजूरा महामार्गावर नाईकनगर गावाजवळ मंगळवारी दि.३ जूनला संध्याकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ओमेश रामदास लेंनगुरे (४०), रा. चिरोली (हेटी), ता. मूल यांचा मृत्यू झाला असुन दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. घरातील होतकरु मुलाच्या मृत्युने कुटुंबावर (Bike Accident) आघात झाला आहे.
चिरोली(हेटी) गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. सदर महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. रस्त्यावर योग्य दिशादर्शक फलक लावले गेलेले नाहीत. परिणामी वाहनचालक गोंधळून चुकीच्या दिशेने वाहने चालवत आहेत. अशाच गोंधळामुळे हा (Bike Accident) अपघात घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अपघात इतका भीषण होता की दोघांचेही पाय तुटले होते आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. अपघात घडल्यानंतर जवळच्या नाईकनगर येथील नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन १०८ क्रमांकावर कॉल करून अॅम्ब्युलन्स मागवली.
ज्या ठिकाणी अॅम्ब्युलन्स १० ते १५ मिनिटांत पोहोचू शकली असती, तेथे ती तब्बल एक तासाच्या विलंबाने पोहोचली. तोपर्यंत अपघातग्रस्त तरुणांची प्रकृती अधिकच गंभीर झाली होती. अपघातग्रस्त दोघांनाही प्रथम चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उमेश लेंनगुरे यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात येत होते. परंतु रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या (Bike Accident) अपघातानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रस्त्याचे काम चालू असूनही योग्य फलक न लावणे, वाहतूक नियंत्रणाचा अभाव आणि अॅम्ब्युलन्स सेवेत झालेला उशीर ही अतिशय निष्काळजी व जीवघेणी बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.