दोघांना वसमत शहरातून तर एका आरोपीला झिरो फाटा येथून अटक!
हयातनगर (Youth Murder) : वसमत तालुक्यातील हयातनगर फाटा येथे गावरान धाब्यावर एका युवकाचा प्रेम प्रकरणातून खून झाला होता. घटनेनंतर हे आरोपी (Accused) फरार झाले होते. या खुनातील आरोपींना अखेर 36 तासाच्या आत हट्टा पोलिसांनी (Hatta Police) मुसक्या आवळल्या. ज्यामध्ये दोघांना वसमत शहरातून तर एका आरोपीला झिरो फाटा येथून अटक केली.
आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना!
याबाबत सविस्तर माहिती अशी की 24 जून मंगळवार रोजी रात्री 9.30 वाजता वसमत तालुक्यातील हयातनगर फाटा येथील गावरान बियर बार येथे आरोपींनी संगणमत करून एका युवतीचे यातील विशाल देवरे यांच्या सोबत असलेल्या प्रेम संबंधाचे कारणावरून विशाल मुंजाजी देवरे यांच्यावर त्यास जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने वार करून त्यास गंभीर जखमी करूनच त्याचा खून केला. तसेच त्याचा मित्र ओमकार देविदास नरवाडे यालाही जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर जखमी (Wounded) केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहीती आहे. सदर घडलेला प्रकार सिसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाला होता.
या प्रकरणी हट्टा पोलिसात मयताचा भाऊ आदीनाथ देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ऋषीकेश मारोतराव कदम रा. सारोळा , शिवाजी धोंडू देवरे, रा. थोरावा, गोपाळ रंगनाथराव देवरे रा. थोरावा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला. घटनेनंतर, यातील सर्व आरोपी फरार झाले होते. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली होती. या पथकांनी तपास चक्र फिरवून अवघ्या 36 तासात गुन्ह्यातील तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, कृष्णा चव्हाण, कासले, प्रीतम चव्हाण, किरण धोत्रे, सूर्यवंशी, सुरवसे यांच्या पथकाने यशस्वी केली आहे.