परभणीतील सेलू पोलीस ठाण्यात करण्यात आली अकस्मात मृत्यूची नोंद!
परभणी (Youth Suicide) : परभणीच्या सेलू तालुक्यातील वालुर येथील एका 30 वर्षीय तरुणांने दारूच्या नशेत नारायण कोरडे यांच्या शेत गट नंबर 296 मधील शेतात चिंचेच्या झाडाच्या फांदीस रुमालाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता उघडकीस आली आहे. या तरुणाने केलेल्या आत्महत्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत पोलीसांनी (Police) दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील वालूर येथील नारायण कोरडे यांच्या शेत गट नंबर 296 मध्ये असलेल्या एका चिंचेच्या झाडास रूमालाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता उघडकीस आले. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक दीपक बोरसे, पोलीस हवालदार गुलाब राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी सेलु रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदना नंतर प्रेत नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आले. मयत लक्ष्मण माधवराव पोले याचा लहान भाऊ भीमा माधवराव पोले याने दिलेल्या खबरे वरून कलम 194 अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मण पोले यांच्या मृत्यूचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वालुर दूर क्षेत्र पोलीस चौकीचे (Valur Remote Area Police Post) पोलीस हवालदार गुलाब राठोड पुढील तपास करत आहेत.




 
			 
		

