निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथे धक्कादायक घटना!
लातूर (Youth Suicide) : जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा बु येथे धक्कादायक घटना घडली आहे. भरत बालाजी सागावे (वय 32) या तरुणाने फेसबुक लाईव्हवर आत्महत्या करण्याची घोषणा करत स्वतःच्या छातीत सुरा खुपसून जीवन संपल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. भरत अनेक वर्षांपासून मुंबई येथे वास्तव्यास होता. 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास तो निलंगा शहरातील लांबोटकर पेट्रोल पंपाजवळ आंब्याच्या झाडाखाली बसून, फेसबुक लाईव्ह करत होता. मी आत्महत्या करत आहे असे सांगत, त्याने काही वेळानंतर छातीत सुरा खुपसला. नातेवाईकांनी फोन करून समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोन बंद करुन टाकला होता.
लातूरात उपचार सुरू असताना रुग्णालयातच मृत्यू!
शोध घेतल्यानंतर, तो पेट्रोल पंपाजवळ रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत सापडला. त्याला तात्काळ लातूरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच काही वेळात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, मी आत्महत्या करत आहे असे फेसबुक लाईव्ह (Facebook Live) करत तरुणाने सांगितले होते. त्यानंतर काही वेळानंतर लगेच तरुणाने छातीत सुरा खुपसून आत्महत्या केली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.