खाजगीकरणाच्या धोरणास विरोध
राज्यव्यापी संपामध्ये सहा संघटनांचा समावेश
हिंगोली (Electricity Workers Strike) : महाराष्ट्रात विद्युत वितरण, पारेषण व निर्मिती या तीनही क्षेत्रांमध्ये कंत्राटीकरणाच्या रुपात होणाऱ्या खाजगीकरणास विरोध दर्शवण्यासाठी आज ९ जुलै २०२५ रोजी (Electricity Workers Strike) महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने राज्यव्यापी एक दिवसीय संप पुकारला आहे.
या संपामध्ये महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, सबॉर्डीनेट इंजिनिअर असोसिएशन, (Electricity Workers Strike) महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉंग्रेस (इंटक),महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियन व तांत्रिक कामगार युनियन(रजि.नं.५०५९) या सहा संघटना सामील होणार आहेत. या संपात राज्यातील ८६ हजार वीज कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता आहे. सध्या मानवाची एक मुलभुत गरज असणाऱ्या विद्युत क्षेत्रामध्ये समांतर परवाना आणि वाढते कंत्राटीकरण यामुळे या क्षेत्रामध्ये खाजगीकरणाचा ‘चंचुप्रवेश’ होत आहे.
विद्युत क्षेत्रातील खाजगीकरणाचा विरोध करण्यासाठी यापूर्वीही संप (Electricity Workers Strike) करण्यात आला होता. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या क्षेत्रातील खाजगीकरण रोखण्याचे आश्वासन दिले होते. यावेळी विद्युत क्षेत्रातील वाढते खाजगीकरण थांबविण्याच्या मुख्य मागणीसह तीनही वीज कंपन्यांमधील सर्व रिक्त पदे भरण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा व ही रिक्त पदे भरताना वर्ग एक ते चार मधील मागासवर्गीय अनुशेष भरून काढावा यासह अन्य मागण्यांचा कृती समितीच्या निवेदनात समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीने सदर निवेदन हे २३ जुन २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत सूत्रधारी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्रातील तीनही वीज कंपन्यांचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहे. या निवेदनावर (Electricity Workers Strike) महाराष्ट्र राज्य स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ. कृष्णा भोयर, सबॉर्डीनेट इंजिनिअर असोसिएशनचे सरचिटणीस संतोष खुमकर, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनचे सरचिटणीस संजय मोरे, महाराष्ट्र राज्य वीज कामगार कॉंग्रेसचे मुख्य सरचिटणीस दत्तात्रेय गुट्टे, महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी विद्युत वर्कर्स युनियनचे अध्यक्ष कॉ. पी. बी. उके आणि तांत्रिक कामगार युनियनचे(रजि.नं.५०५९) सरचिटणीस प्रभाकर लहाने यांची स्वाक्षरी आहे.
हिंगोली जिल्ह्यातील (Electricity Workers Strike) वीज कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने आजच्या संपात सहभागी व्हावे असे आवाहन विविध वीज संघटनांचे पदाधिकारी कॉ. टी. के. टापरे, कॉ.जे.एस.भालेराव, संतोष गिते, बी. ए. मापारी आदींनी केले आहे.