कन्हान () : किसान ब्रिगेड नागपुर जिल्हयाची आढावा बैठक दैनिक देशौन्नती कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीत केरडी येथील प्रगत शेतकरी (Rahul Wankhede) राहुल वानखेडे यांची (Kisan Brigade) किसान ब्रिगेड पारशिवनी तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
गुरूवार (दि.५) जुन २०२५ ला दुपारी दैनिक देशौन्नती (Daily Deshonnati) कार्यालय नागपुर येथे मागेल त्यालाच /गरज त्याला कर्जमुक्ती चळवळ अंतर्गत आढावा बैठक शेतकरी नेते व दैनिक दे. शौन्नतीचे मुख्य संपादक, (Kisan Brigade) किसान ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष मा. प्रकाश भाऊ पोहरे (Prakash Pohare) यांच्या अध्यक्षेत आणि राज्यकार्यकारणी सदस्य मा. दिवाकर गावंडे व शरद वानखेडे यांच्या प्रमुख उपस्थित नागपुर जिल्हा शेतकरी कर्जमुक्ती चळवळी ची आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीत किसान ब्रिगेड (Kisan Brigade) पारशिवनी तालुका अध्यक्ष पदी केरडी चे प्रगत शेतकरी राहुल कवडुजी वानखेडे (Rahul Wankhede) यांची तर सावनेर शहर तालुका अध्यक्ष शेतकरी दिनेश इंगोले यांची आणि सावनेर ग्रामिण तालुका अध्यक्ष यशवंतराव पाटील यांची नियुक्ती करून मा. प्रकाश भाऊ पोहरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन शेतकरी हितार्थ कार्य करण्यास शुभेच्या देऊन अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी देशौन्नती प्रतिनिधी मोतीराम रहाटे, मुकेश तिवारी, कमलसिंह यादव, शेतकरी प्रकाश काठोके, चंद्रभानजी वानखेडे, गजानन लेकुरवाळे आदीनी दोन्ही नियुक्ती बद्दल श्री दिनेश इंगोले, राहुल वानखेडे , यशवंतराव पाटील यांचे अभिनंदन केले.