जि.प.शाळा हिवरा येथील प्रकार
जांब (Zilha Parishad School) : मोहाडी पंचायत समिती अंतर्गत येणार्या भंडारा जिल्ह्याचे शेवटचे टोकाला असलेला गाव हिवरा येथे जिल्हा परिषदची शाळा असून त्या ठिकाणी वर्ग पहिलीपासून ते सातवीपर्यंत वर्ग असून यामध्ये शिकविणारे तीन शिक्षक उपलब्ध आहेत. शाळा व्यवस्थापन समिती यांनी वारंवार पत्र व्यवहार करून शाळेला शिक्षक देण्यात यावे, (Zilha Parishad School) जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता पत्रव्यवहार केला होता. परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष करून शाळेला एकही शिक्षक दिलेला नाही.
वर्ग सात आणि शिक्षक तीन अशा परिस्थितीत तीनच शिक्षक वर्ग एक ते सातवीपर्यंत कसे काय सांभाळणार त्यामुळे ग्रामस्थांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने आजपासून होणारी पॅड परीक्षेवर बहिष्कार टाकला आणि जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी आणि (Zilha Parishad School) शाळा व्यवस्थापन समितीने घेतली त्यामुळे शाळेला कुलूप लावण्यात आला आहे. परंतु त्या ठिकाणी शिक्षक नसल्यामुळे अध्यापनाचे धडे विद्यार्थ्यांना मिळत नाही. सध्या आता शासनामार्फत राबविल्या जाणार्या परीक्षा सुरू असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये परीक्षेची सुरुवात झालेली आहे, परंतु त्या ठिकाणी वर्ग तीन ते चार या वर्गाला शिकवणारे शिक्षकच नाही तर त्या वर्गातील विद्यार्थ्यांनी पॅड ची परीक्षा द्यावी कशी हा प्रश्न गावातील लोकांमध्ये निर्माण झाला होता.
या ठिकाणी अनेक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचे अध्यापन होत नाही. मग ही परीक्षा विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे द्यावी आणि या विद्यार्थ्यांनी पॅडच्या परीक्षेमध्ये काय लिहावं हेच विद्यार्थ्यांना जर माहीत नसतील तर विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे या परीक्षेला समोर जावे? हा प्रश्न निर्माण झाला होता. मागील अनेक वर्षापासून या शाळेतील रिक्त पदे भरलेली नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि त्यामध्येच अशी परीक्षा की ज्यामध्ये विद्यार्थी काहीच देऊ शकत नाही शिक्षकच नाही तर विद्यार्थी कशाप्रकारे पेपर सोडवेल?
हा एक मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पालकाच्या मनात निर्माण झाला होता त्यामुळे आज दि.१० ऑक्टोबरला आजपासूनच पॅड परीक्षेला सुरुवात झाली. त्यामुळे हिवरा येथील ग्रामवासी एकत्र झाले आणि शाळेबद्दल आणि प्रशासनाबद्दल रोज व्यक्त केला त्यामुळे येथे समस्त नागरिकांनी शाळेला कुलूप लावण्याचे ठरविले. जोपर्यंत शिक्षक देत नाही तोपर्यंत शाळा उघडू देणार नाही अशा प्रकारची भूमिका ग्रामवाशी यांनी घेतली.
सध्या प्रथम सत्र परीक्षा सुरू असून वर्ग एक ते सातवी पर्यंत शासन स्तरावर घेतली जाणारी पॅड ची परीक्षा आज पासून सुरू झालेली आहे. परंतु या शाळेमध्ये तीनच शिक्षक कार्यरत असून हे तीन शिक्षक वर्ग पहिलीपासून ते सातवी पर्यंत अध्यापन कसे काय करू शकतील याकरिता शाळा व्यवस्थापन समितीने या ठिकाणी शिक्षक देण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होणार नाही. याकरिता शासनाकडे व शिक्षण विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा एकही शिक्षक या ठिकाणी देण्यात आलेला नाही म्हणून गावकर्यांनी आणि शाळा व्यवस्थापन समितीने असे ठरविले की या ठिकाणी होणारी पॅड ची परीक्षा रद्द करण्यात यावी. त्यामुळे शाळेला कुलूप लावण्यात आला.
-राहुल चवळे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती हिवरा
सध्या पॅडची परीक्षा सुरू असून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित करू नका, अशी आम्ही गावकर्यांना विनंती केली त्या ठिकाणी असलेले शिक्षक यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत झालेली आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी त्यांना थांबवू शकत नाही परंतु तेथील ग्रामवासी जोपर्यंत नवीन शिक्षक येत नाही तोपर्यंत यांना सोडू नये या भूमिकेवर ठाम होते. त्यांना आम्ही समजवण्याच्या प्रयत्न केला समोरची कारवाई करण्याकरिता वरिष्ठ अधिकार्याला यांची माहिती देण्यात येईल.
-शरद कुक्कडकर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मोहाडी