प्रकाश पोहरे यांचा पुणेरी सत्कार!
पुणे (Prakash Pohare) : ‘शिपत्र’ अर्थात्त अखिल भारतीय किसान परिसंघ या शेतकऱ्यांच्या राष्ट्रीय संघटनेच्या (National Farmers Union) सचिवपदी नियुक्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रीयस्तरातर मांडण्याची संधी मिळाली असे प्रतिपादन शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी आज येथे केले.
दिलीपसिंग गोसल मित्र मंडळाचा पुढाकार!
शेतकऱ्यांची राष्ट्रीय संघटनेच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल दिलीपसिंग गोसल (Dilipsingh Gosal) मित्र मंडळाच्या ततीने पुणे बानवाडी येथे आयोजित कार्यक्रमात प्रकाश पोहरे यांचा भावपूर्ण सत्कार (Felicitation) करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार उल्हास पठार यांचे हस्ते प्रकाश पोहरे यांना पुणेरी पगडी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सौ. साधनाताई पोहरे (Sadhanatai Pohre) यांचा अनिता टेंभे-गोसल (Anita Tembhe-Gosal) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित!
या कार्यक्रमाला पुण्यातील सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. विविध पक्षाचे नेते, सामाजिक नेते माजी राज्य मंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड, सामाजिक सरहद संस्थेचे संजय नाहर, शाहीर सुरेशकुमार वैराळकर, डॉ. सतीश देसाई, युवराज शाह, शिव पाचडे, प्रशांत वराडे, डॉ. शहाजी देशमुख, गणेशन शैलेश पगरिया, सतीश देशमुख, पुरुषोत्तम गावंडे, अनिता टेंभे-गोसल, ऋचा शेंडे, प्रसन्ना कुलकर्णी, राहुल सुरतकर, निखिल पंचभाई, प्रवीण बक्षी, डॉ. छाया देशमुख, सोनाली वराडे, शेनव बागवे, अल्पना सुरतकर, सुषमा गणेशन, कीर्ती वैराळकर मान्यवर उपस्थित होते. दिलीपसिंग गोसल यांनी कार्यक्रमाचे सूत्रबद्ध नियोजन केले. प्रास्ताविक करताना गोसल यांनी सांगितलेली, राजकीय मूल्यांचा आज ऱ्हास झाला आहे. अशा काळात प्रकाशभाऊंच्या कामाचे जास्त महत्व अधोरेखीत होते. उल्हास पवार यांनी पोहरे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली.
जुन्या आठवणींना उजाळा!
यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रकाश पोहरे यांनी एक जुना प्रसंग सांगताना उल्हास पवार यांनी मुत्सद्देगिरी करून कशी मदत केली होती, त्याची आठवण करून दिली. तसेच मोहन धारिया यांच्याबरोबर शेतकऱ्यांच्या केंद्रीय कर्ज माफी प्रकरणी केलेल्या प्रयत्नांची आठवण सांगितली. एक छोटेखानी, कौटुंबिक कार्यक्रम पुणेकरांकडून सत्कार होणे तसे दुर्मिळ वाव. या निमित्ताने प्रकाश पोहरे यांच्या कार्याची पावती मिळाली. ते फक्त संपादकच नाहीत तर त्यांच्या विविध पैलूची नवीन ओळख पुणेकरांना झाली.