तहसीलदार यांना निवेदन!
मानोरा (Heavy Rain) : तालुक्यातील उमरी मंडळातील उमरी, पोहरादेवी सह इतर गावात दि. २९ ऑगस्ट २, १९ व २७ सप्टेंबर रोजी झालेल्या सततच्या ढगफुटी अतिवृष्टीमुळे लोकांच्या घरात पुराचे पाणी गेल्यामुळे अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच घर पडझड झाल्याने शेतमजूर वर्ग हवालदिल झाला आहे. परंतु आजपर्यंत सबंधित विभागाकडून तहसिल कार्यालयात पंचनामे सादर न झाल्यामुळे खावटीची आर्थिक मदत (Financial Aid) मिळालेली नाही. त्यामुळे दिवाळीपुर्वी पूरबाधीत लोकांना नुकसान भरपाई द्यावी असे निवेदन तहसीलदार यांना दि. १३ ऑक्टोबर रोजी दिले आहे.
नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने जीवनावश्यक वस्तूचे अतोनात नुकसान!
निवेदनात नमूद केले आहे की, उमरी मंडळातील पोहरादेवी सह इतर गावात माहे ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये चार वेळा ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाली. गावात आलेल्या पुराच्या पाण्यामुळे अनेक नागरिकांच्या (Citizens) घरात पाणी घुसल्याने जीवनावश्यक वस्तूचे अतोनात नुकसान झाले. तसेच अनेक घरांची पडझड झाली. याबाबत संबंधित विभागाने पंचनामे केली, परंतु तहसिल विभागात (Tehsil Division) अहवाल सादर न केल्यामुळे नुकसानग्रस्त पूर बाधिताना अद्यापपर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन (Statement) दिले आहे. निवेदन देतेवेळी विजय पाटील, ठाकुरसिंग चव्हाण, अनिल राठोड, गोविंद राठोड, गजानन राऊत, श्रावण मेटकर, अशोक राठोड, गणेश खंडारे, गणेश भोरकडे, चंदू जाधव आदी उपस्थित होते.