हिंगोली (Collector Prohibition order) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस ठाण्याच्या समोरील रस्त्यावर काही जणांनी सार्वजनिक शांततेचा भंग करून रस्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या अडवून जमावबंदी आदेशाचे (Collector Prohibition order) उल्लंघन केल्याने १५ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
गोरेगाव चौफुली ते गोरेगाव गावात जाणाऱ्या रस्त्यावर २१ मार्च रोजी दुपारी १२ च्या सुमारास काही जणांनी सार्वजनिक शांततेचा भंग करून रस्ता अडवून घोषणाबाजी केल्याने या संदर्भात त्यांना सनदशीर व कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा व करण्यात येणाऱ्या (Collector Prohibition order) आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे वाहतुकीस अडथळा होऊन नागरीकांना त्रास होऊ शकतो.
यासाठी रस्तारोको आंदोलन करू नये, अशी समज त्यांना दिली होती. सध्या जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश लागू असल्याने ५ किंवा त्यापेक्षा अधिक इसमांना एकत्र जमा होता येत नाही अशा सूचना दिल्यानंतरही आंदोलन कर्त्यांनी तुम्ही गुन्हे दाखल करा व आरोपीस अटक करा तरच आम्ही रस्त्यावरून उठणार असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद झळके यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात रात्रीच्या सुमारास रितसर तक्रार दिली.
ज्यामध्ये जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश लागू (Collector Prohibition order) असताना देखील त्याचे व लोकसेवकाने रितसर दिलेल्या आदेशाचे पालन न करता २१ मार्चला रास्तारोको आंदोलन केल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश बाळासाहेब देशमुख, निखिल पानपट्टे, प्रमोद महाजन रा सेनगाव, गजानन कावरखे (शेतकरी संघटना) रा. गोरेगाव, नामदेव पतंगे रा. ताकतोडा, प्रविण. तपोवन, संतोष आनंदा गुडदे रा. कडोळी, अनंदा लक्ष्मण बोडखे यासह इतर पाच ते सात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या (Collector Prohibition order) प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक झळके हे करीत आहेत.