Gadchiroli :- जिल्हा मुख्यलयाचे ठिकाण असलेल्या इंदिरा गांधी चौकात आज रविवार २५ मे रोजी झालेल्या दोन अपघातात १ ठार (Death) तर दुसरा जखमी झाला आहे. सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान झालेल्या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नांव गणेश चौधरी (४३) रा. मुल असे आहे.
मोठया प्रमाणात होत असलेले अतिक्रमणही अपघातासाठी कारणीभूत
दुपारी १२ वाजताच्या दरम्यान झालेल्या अपघातातील जखमीचे नांव ईश्वर सहारे (३७) हल्ली मु. रा.गडचिरोली असे आहे. मालवाहु अवजड ट्रक नागरीकासाठी कर्दनकाळ ठरत असतांनाच इंदिरा गांधी चौकात मोठया प्रमाणात होत असलेले अतिक्रमणही अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसुन येत आहे. आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास गणेश चौधरी हा पायी इंदिरा गांधी चौकातील पानठेल्याकडे जात असतांना चामोर्शीकडून येणार्या लोहखनिज वाहुन नेणार्या एमएच ३४ बीजी ७१३५ या क्रमांकाच्या अवजड ट्रकने त्याला इंदिरा गांधी चौकात धडक दिली. यामध्ये तो जागीच ठार झाला. अपघात होताच नागरीकांनी संताप व्यक्त केला. ट्रकच्या काचा फोडल्या. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ट्रकचालक फरार झाला. मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले .