परभणी (Parbhani Water Supply) : जिल्ह्यात ग्रामीण भागात यावर्षी झालेल्या पाणी टंचाईच्या निवारणासाठी ३५ टँकरद्वारे २ हजार ५१० फेर्यांमधुन (Water Supply) पाणी पुरवठा करण्यात आला होता. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून शासनाकडे १ कोटी ३१ लाख रुपयांच्या झालेल्या खर्चाची मागणी केली होती. त्या अंतर्गत सदर निधी राज्य शासननाने मंजुर केला असून छत्रपती संभाजी नगर आयुक्तालयाकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती शासन निर्णयाद्वारे देण्यात आली आहे.
मागील वर्षी पावसाळ्यात अपेक्षीत पाऊस न झाल्याने यावर्षी फेब्रुवारी ते जुन दरम्यान जिल्ह्यातील अनेक गाव खेड्यांना (Water Supply) पाणी टंचाईला समोरे जावे लागले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने तात्पुरत्या स्वरुपात विविध उपायोजनां राबविण्यात आल्या. त्यात टँकर्स, बैलगाडीद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामध्ये जिंतूर तालुक्यात सर्वाधीक १९ टँकर्सद्वारे १ हजार ५९१ फेर्या करण्यात आल्या.
या व्यतीरिक्त मानवत तालुक्यात चार टँकर्सद्वारे ९३ फेर्या,सेलू तालुक्यात दोन टँकर्सद्वारे १०४ फेर्या, सोनपेठ तालुक्यात दोन टँकर्सद्वारे १२६ फेर्या, परभणी तालुक्यात १ टँकरद्वारे ८० फेर्या, गंगाखेड तालुक्यात सात टँकर्सद्वारे ५१६ फेर्या करण्यात आल्या. तर पुर्णा,पालम, पाथरी तालुक्यात टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्याची गरज भासली नव्हती. याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण( Water Supply) पाणी पुरवठा विभागा अंतर्गत संबधतीत तालुकास्तरीय पंचायत समितीकडून करण्यात आले होते. ३५ टँकर्सद्वारे झालेल्या २ हजार ५१० फेर्यांसाठी राज्यशासनाकडे १ कोटी १३१ लाख ३४ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्याला राज्यशासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने शासन निर्णयाद्वारे मंजूरी दिली असून तो निधी छत्रपती संभाजी नगर विभागीय आयुक्तालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला आहे. उन्हाळ्यात (Water Supply) पाणी टंचाई ग्रस्त २६ गावे ८ तांड्यांवर ३५ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता.
विभागीय आयुक्तालयाकडून जिल्हा परिषदेला निधी वर्ग होणार
ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणासाठी २०२३ -२४ या वर्षी उन्हाळ्यात टँकर्सद्वारे (Water Supply) पाणी पुरवठा करण्यासाठी खर्च झालेला १ कोटी ३१ लाख ३५ हजारांचा निधी राज्य शासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाकडे प्राप्त झाला असुन पुढील काही दिवसात तो निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग होणार असून त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून संबधीत पंचायत समितीच्या मार्फत वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जि.प.च्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.