वर्धा (Wardha) :- सेलू तालुक्यातील एका गावात १० ते १२ हल्लेखोरांनी एका घरावर सशस्त्र हल्ला करत दाम्पत्याला तलवारीने जखमी करत अल्पवयीन मुलीचे जबरीने अपहरण (Abduction) केले होते. या घटनेत सहा हल्लेखोरांना अटक करण्यात आली होती. फरार तिघांना सेलू पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने कलगाव, ता. दिग्रस, जिल्हा यवतमाळ येथून २१ रोजी अटक केली.
तिन्ही फरार आरोपींनी घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी थेट शेगाव गाठले
शंकर बानोत (२६), शुभम अराडे (२२), दोन्ही रा. सेलू आणि योगेश ढोबळे (२२ रा. घोराड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. हल्लेखोरांनी गावात सशस्त्र हल्ला करत कुटुंबाला जखमी केल्यानंतर पालकमंत्री (Guardian Minister), खासदारांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सखोल चौकशीच्या सूचना केल्या होत्या. अखेर सेलू ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास करून तिघांना बेड्या ठोकल्या. उर्वरित बाकी फरार आरोपीनाही लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. तिन्ही फरार आरोपींनी घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी थेट शेगाव गाठले. शेगाव येथे मुक्काम करून दर्शन करत यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या कलगाव येथे मावशीकडे पैसे मागण्यासाठी गेले होते. मावशीकडे गेल्यावर तेथे मुक्काम केला. अखेर तांत्रिक तपासावरून पोलिसांनी तिन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या.