पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित!
रिसोड (Social Justice Day) : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी (Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राज्याची संकल्पना राबविली. त्यांनी सामाजिक आणि आर्थिक सुधारणांचा (Economic Reforms) पायाही घातला, असे प्रतिपादन रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Agricultural Produce Market Committee) सभापती विष्णूपंत भुतेकर यांनी केले. रिसोड बाजार समितीच्या कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी ‘सामाजिक न्याय दिन’ साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समितीचे संचालक रवि चोपडे, राजु पाटील डांगे, गजानन सपकाळ, ज्ञ्ज्ञानेश्वर बोन्डे, बाजार समितीचे लेखापाल विनोद गिऱ्हे, निरक्षक विजय देशमुख, सचिन पवार, कैलास मगर, सह भूमिपुत्रचे पदाधिकारी व कार्यकर्ते (Activists) मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस बाजार समितीचे सभापती यांच्या सह मान्यवरांनी अभिवादन केले. याप्रसंगी बाजार समितीचे कर्मचारी व शेतकरी (Farmer) उपस्थित होते