पंधरा ते वीस गावातील लोकांना १२ किलोमीटरचा फेरा
बामणी (Heavy Rain) : शुक्रवार १६ मे रोजी आलेल्या अवकाळी पावसामुळे नवीन पुल बांधकामाच्या ठिकाणी बनविलेला जोड रस्ता वाहून गेला. नवीन रस्ता बनविण्यास ठेकेदार चालढकल करीत असल्याने परीसरातील १५ ते २० गावातील नागरीकांना सिरोंचा तालुका मुख्यालय गाठण्यासाठी १२ किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
सिरोंचा तालुक्यातील कांबलपेठा बस थांब्याजवळील टेकडा – रेगुंठा रस्त्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे. (Heavy Rain) पुलाचे बांधकाम एकदम निकृष्ठ दर्जाचे सुरु असून त्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.
नागरीकांचे आवागमन सुरळीत राहण्यासाठी कच्च्या स्वरूपात बनवलेला रस्ता शुक्रवारी आलेल्या (Heavy Rain) मुसळधार अवकाळी पावसामुळे वाहुन गेला. मात्र कंत्राटदाराने नवीन रस्ता तयार केला नाही. यामुळे टेकडा, रेगुण्ठा परिसरातील नागरीकांना सिरोंचा तालुका मुख्यालयी जाण्यासाठी तब्बल १२ किलोमीटरचा फेरफटका मारावा लागत आहे. यामुळे नागरीकांन संताप व्यक्त केला असून प्रशासकीय अधिकार्यांनी या बाबीची दखल घ्यावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.